बीड – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी उपोषण करणाऱ्या मंगेश साबळे यांना त्यांच्या लढ्यासाठी रविराज साबळे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. रविराज साबळे म्हणाले की,
“कृषीप्रधान भारत म्हणायला राहिला, नेता बंगळ्यात राहतोय आणि शेतकरी मायबाप आजही कुडात आहे.”
ते म्हणाले की, इंग्रज आणि मुघलांच्या काळापेक्षा ह्या सरकारची हीन वृत्ती अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देण्याऐवजी, सरकार आणि नेते मंडळी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांवर दडपशाही करत आहेत.
रविराज साबळे यांनी स्पष्ट केले की, या सरकारच्या विरोधात शेतकरी पुत्र म्हणून त्यांनी निषेध जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणे हे प्रत्येक शेतकरी आणि समर्थकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.




