मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. शेतजमिनी, जनावरे, घरे आणि संपूर्ण गावे पाण्याखाली गेली आहेत. या गंभीर परिस्थितीतही शासनाकडून मदतीसाठी अनेक निकष ठरवले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार उबाठा शिवसेना नेते ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“सर्वच वाहून गेलं… पंचनामे कशाचे करायचे?”
त्यांच्या या वक्तव्याने प्रशासनाच्या मदतकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडित नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.




